धनकवडी - हिंजवडीजवळील मारुंजी गावातील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या फ्लेवर्स चायनीज व शेजारीच असलेल्या आधेश्वर शिट कव्हर या दोन दुकानांना भीषण आग लागली आहे. शुक्रवारी रात्री दोन वाजता ही घटना घटली. पीआरडीएमए अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
पीएमआरडीए अग्निशामक केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन यांनी सांगितले की मारुंजी गावात रात्री दोन वाजता शीट कव्हरच्या दुकानाला आग लागली.
अग्निशामक केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन, फायरम संदीप शेळके, हितेश आहेर, राहुल शिरोळे, संदीप तांबे, प्रकाश मदने, सुरज इंगवले, अक्षय काळे, योगेश मायनाळे, वैभव कोरडे, विकास गायकवाड, मयूर गोसावी यांनी ही कामगिरी केली आहे.

