नोकरदारांना झटका,पीएफवरील व्याजदर घटला

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली : भविष्यनिर्वाह निधीच्या व्याज दरात कपात करण्यात आली आहे. आता नवीन व्याज दर 8.5 टक्के असून हा 7 वर्षांचा नीचांक आहे.
भविष्य निर्वाह निधीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा 6 कोटी कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. गेल्या वर्षी भविष्य निर्वाह निधीवर 8.65 टक्के इतका व्याज दर होता.
कामगार मंत्रालयाने व्याज दर गेल्या वर्षाच्या पातळीवर कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र सध्याच्या कमी व्याज दराच्या परिस्थितीमध्ये अर्थ मंत्रालय व्याज दर वाढीव पातळीवर कायम ठेवण्यास राजी होणे शक्‍यच नव्हते.
संघटनेच्या बैठकीनंतर केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली.
कर्मचाऱ्यांना 8.5 टक्के इतका व्याज दर दिल्यानंतर भविष्यनिर्वाह निधी संघटनेकडे अतिरिक्‍त 700 कोटी रुपये राहणार आहेत.
जर व्याज दर 8.55 टक्के दिला असता, तर संघटनेकडे केवळ 300 कोटी रुपये शिल्लक राहिले असते. त्यामुळे सर्वसमावेशक विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजले जाते आहे.
आता हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकदे संमतीसाठी पाठवण्यात येईल. कारण या संदर्भात अर्थ मंत्रालय हमी देत असते.
रिझर्व बॅंकेने गेल्या वर्षी आपल्या व्याज दरात 1.35 टक्‍क्‍यांची कपात केली आहे.
त्यानंतर व्यवसायिक बॅंकांनी आपल्या व्याजदरात वेळोवेळी कपात केली आहे. सर्वच व्याजदर कमी होत असल्यानंतर केंद्र सरकारने अल्पबचतीवरील व्याजदरातही कपात केली आहे.
त्यामुळे केवळ भविष्यनिर्वाह निधीवर जास्त व्याज देणे बरोबर नाही, असे अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीला वेळोवेळी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.