वाकडमध्ये इन्फोसिस कंपनीतील संगणक अभियंत्याची आत्महत्या

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी (zunjarzep. In):- इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे घडली. ते इन्फोसिस कंपनीमध्ये संगणक अभियंतापदावर कार्यरत होते. प्रसून कुमार झा (वय २८, रा. लॉरेल सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसून हे हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड परिसरात राहत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.