माजी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आपल्या कामास प्रारंभ केला.

0 झुंजार झेप न्युज

 


पुणे:--कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व त्याबाबतीत शासनाला प्रादुर्भावासंबंधित उपलब्ध होणारी माहिती विश्लेषण करून त्याबाबतीत पुढील उपाययोजना ठरविण्याच्या दृष्टीने व कोव्हिड-१९ प्रादुर्भाव संपल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याबाबतीत व इतर अनुषंगिक बाबींबाबत मुख्यमंत्री महोदयांना सल्ला देण्यासाठी माजी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी कामास प्रारंभ केला. आज त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.  डॉ.दिपक म्हैसेकर, भा.प्र.से. (२००३) हे विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे या पदावरून दिनांक ३१/०७/२०२० रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. पुणे विभागात कोव्हिड-१९ च्या नियंत्रणासाठी काम करताना त्यांचा अनुभव विचारात घेता, त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार (Advisor, CMO) म्हणून मानसेवी (Honorary) तत्वावर नियुक्ती करण्यात आली आता  सध्या त्यांचे मुख्यालय पुणे येथे आहे.


✍️Www.zunjarzep.in/✍️

Follow us on :-

Instagram :-https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25
                    
Twitter :-(@ZunjarZep): https://twitter.com/ZunjarZep?s=09

Facebook :- https://www.facebook.com/zunjarzepnews/


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.