रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो.9146400308
प्रहार जनशक्ति पक्षच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे नामदार. बच्चूभाऊ कडू यांच्याहस्ते निगडी मध्ये उद्घाटन.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे निगडीमधे ना.बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार(ता.९)रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय जननेते आणि विद्यमान मंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते निगडी प्राधिकरण मध्ये करण्यात आले.सोशल डिस्टसिंग पाळत पक्षाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते.यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य तालुक्यांच्या नियुक्त्यांची औपचारिक घोषणा पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटक नीरज कडू यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना बच्चू भाऊंनी पक्ष आणि कार्यकर्ता हा ज्या ठिकाणी शासन पोहोचत नाही अशा ठिकाणी पोहोचला पाहिजे.तसेच गरीब,शोषित,अन्यायग्रस्त अशा घटकांसाठी कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचे रान करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी नविनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या विस्ताराचा भाग म्हणून पक्षाने आता पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष दिले आहे. बच्चू भाऊ कडू यांचे समाजकार्य आणि त्यांची जनमानसात असलेली स्वच्छ प्रतिमा याचा पक्षाला विस्तारात निश्चितपणे फायदा होईल असा दावा नीरज कडू यांनी केला आहे.तसेच पुढील काळात जनसामान्यांना अडचणीच्या असलेल्या समस्यांना पक्ष वाचा फोडत राहील आणि सर्व प्रकारच्या पुढील काळातील निवडणुका लढविण्याची तयारी पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

