रमेश ब्रम्हा संपादक. झुंजार झेप
मो. 9146400308
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करु, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे
मुंबई : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करु, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले, “यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकवण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करु नये.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 सप्टेंबर) मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील, अभ्यासक यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यांच्या या न्यायालयीन लढाईच्या अनुषंगाने सूचना ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठा समाज हा लढवय्या आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या भावना मी समजून घेऊ शकतो. मात्र तुमच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या आणि सरकारच्या आहेत हे लक्षात घ्या. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा कायदा विधानमंडळात संमत झाला तेव्हा त्यामागे सर्व पक्ष होते. एकमताने हा निर्णय झालेला होता.”
Follow for more updates.
news @zunjar zep

