मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ..!

0 झुंजार झेप न्युज

 


रमेश ब्रम्हा संपादक. झुंजार झेप 

मो. 9146400308


प्रादेशिक हवामानशास्त्र केद्र, मुंबई यांनी दिनांक १०.०९.२०२० रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या
सूचनेनुसार दिनांक ११.०९.२०२० ते १६.०९.२०२० या काळात मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्यात
(ज्यात नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे) विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली
आहे.


खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
या गोष्टी करा:

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाने टाळा. जर मोकळ्या जागेत असाल
आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके
घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

या गोष्टी करु नकाः

१) आकाशात विजा चमकत असल्यास मोबाईल फोनचा वापर टाळा. घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका आणि कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा
शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४) धातूच्या उंच मनोन्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर
थांबण्याइतकेच धोकादायक आहे.


(श्रीमती संतोषी देवकुळे)
निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड.

#zunjarzepnews #nanded #mumbai

Www.zunjarzep.in/

Follow us on :-

Instagram :-https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25
                    
Twitter :-(@ZunjarZep): https://twitter.com/ZunjarZep?s=09

Facebook :- https://www.facebook.com/zunjarzepnews/






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.