अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु, मराठा समाजाचा इशारा

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

...अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु, मराठा समाजाचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पंढरपूर : मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. जर 20 सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.
नुकतंच पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला रामभाऊ गायकवाड, धनाजीराव साखळकर, सागर यादव, किरण घाडगे, संदीप मांडवे यांनी हजेरी लावली. 

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती देत आरक्षणाचे लाभ थांबवले आहेत. या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच युवकांना नोकरीसाठी आरक्षण उपयुक्त आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाने सरकारला आता अल्टिमेटम दिला आहे. जर 20 सप्टेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर 21 सप्टेंबरपासून मराठा समाजाच्या रोषाला सरकारला तयार रहावे लागेल. मराठा समाजातील अनेक लोक गनिमी काव्याने समाजातील आंदोलन करतील. याची सगळी जबाबदारी सरकारवर असेल, असा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे.

#zunjarzepnews

Www.Zunjarzep.in

Follow us on-

instagram-@zunjarzep

twitter-@झुंजार झेप 

fecebook-@zunjarzepnews

 






 








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.