औरंगाबाद पदवीधर मतदार निवडणूक 2020 साठी निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचना

0 झुंजार झेप न्युज

 औरंगाबाद पदवीधर मतदार निवडणूक 2020 साठी निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचना

औरंगाबाद: येत्या 1 ‍डिसेबंर रोजी मराठवाड्यातील 8 ही जिल्हयात पदवीधर मतदासंघाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना पदवीधर मतदारांनी योग्य पध्दीतीने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदान करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवून मतदान करावे याविषयी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे करण्यात आल्या आहेत.

   मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळया रंगाचा स्केच पेनचाच वापर करावा.याशिवाय इतर कुठलेही पेन,पेन्सिल,बॉलपाँईट पेन यांचा वापर करु नये,ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे.त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Oredr of Preference)असे नमूद केलेल्या रकान्यात "1" हा अंक नमूद करून मतदान करावे.निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असली तरी "1"हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा.निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत,तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील,उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2,3,4 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार "पसंतीक्रम"(Oredr of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा.

तसेच कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करणे गरजेचे आहे.तसेच एकच अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमुद करु नये.पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल.उदा.1,2,3,इत्यादी आणि तो एक,दोन,तीन,इत्यादी असा शब्दात दर्शवू नये,अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3,इत्यादी किंवा रोमन स्वरूपातील I,II,III,इत्यादी किंवा संविधानाच्या 8व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील.

याबरोबरोच मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये.तसेच अंगठयाचा ठसा उमटवू नये, तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर ( √ )(X)अशी खुण करू नये. अशी मतपत्रिका बाद ठरेल,तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर "1" हा अंक नमूद करून तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे.इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरूपाचे असून ते अनिवार्य नाहीत.असे निवडणूक निर्णय अधिकारी -5 औरंगाबाद पदवीधर मतदासंघ कळविण्यात आले आहे.

नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.