नंदूरबारमध्ये ट्रकची कारला धडक, कार 30 फुट दरीत कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला
नंदूरबार : धुळ्यात ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. ट्रकने धडक दिल्याने कार पुलावरुन कार कोसळली (Nandurbar Car Accident). या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धुळ्याकडून सुरतकडे जाणाऱ्या स्विफ्ट गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार पुलावरुन थेट तीस फुट खोल दरीत कोसळली आणि कारचा चक्काचूर झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात जखमी आणि मृत हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आहे. विसरवाडी पोलीस आणि ग्रामस्थांनी अपघाताच्या ठिकाणी मदत कार्य करुन जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
कोंडाईबारी घाटातील या पूल बनतोय मृत्यूचा सापळा
कोंडाईबारी घाटातील या पुलावरुन मागील महिन्यात लक्झरी बस कोसळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याचे समोर आले आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होऊन निरपराध वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या राष्ट्रीय महामार्ग वरील मुलांची सुरक्षितता ऑडिट होणे गरजेचे आहे.

