राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान, पुरणपोळीचं जेवण देत दिवाळी केली खास!
बच्चू कडू यांनी सकाळी मधुबन वृद्धाश्रमातील वृद्धांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घातलं. सर्वांना नव्या कपड्यांचं वाटप केलं. महिलांना साडीचोळी, शॉलचा त्यात समावेश होता. तसंच सर्वांना खास पुरणपोळीचं जेवण घालत, बच्चू कडू यांनी स्वत: जेवण वाढलं
अमरावती: राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आपल्या वेगळ्या अंदाजासाठी आणि आपल्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच ओळखले जातात. बच्चू कडू यांच्या वेगळेपणाचा प्रत्यय आजही आला. आज धनत्रयोदशी आहे. सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत आहे. मात्र, ज्यांना कुणी नाही किंवा जे लोक वृद्धाश्रमात आपलं उर्वरित जिवन व्यतीथ करत आहेत. अशा वृद्धांसाठी बच्चू कडू यांनी खास दिवाळी साजरी केली. अमरावतीमधील मधुबन वृद्धाश्रमात बच्चू कडू यांनी वृद्धांसोबत दिवाळीचा आनंद लुटला.
बच्चू कडू यांनी सकाळी मधुबन वृद्धाश्रमातील वृद्धांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घातलं. सर्वांना नव्या कपड्यांचं वाटप केलं. महिलांना साडीचोळी, शॉलचा त्यात समावेश होता. तसंच सर्वांना खास पुरणपोळीचं जेवण घालत, बच्चू कडू यांनी स्वत: जेवण वाढलं. यावेळी वृद्धांश्रमातील सर्वांचे डोळे पाणावले होते. जिथे पोटच्या पोरांनी या वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवलं. तिथे बच्चू कडू यांच्यासारख्या एका मंत्र्यांने दाखवलेला जिव्हाळा या वृद्धांच्या मनाय मायेची उब निर्माण करणारा ठरला.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन




