पुणे जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. राहुल शालिग्राम भदाणे, असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.
