आया देश विक्रेता” हे गाणं गायिल्यामुळे गायकांना जीवे मारण्याची धमकी

0 झुंजार झेप न्युज

आया देश विक्रेता” हे गाणं गायिल्यामुळे गायकांना जीवे मारण्याची धमकी

 मुंबई दि.08नोव्हेंबर 2020(झुंजार झेप न्युज प्रतिनिधी):- विशाल गजीपुरी व सपना बौद्ध यांनी एक प्रबोधनपर गीत गायिले असून ते प्रधानमंत्री मोदी यांच्या वास्तवावर अवलंबून असल्याने मोदीभक्त या दोन गायकांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करत असून त्यांना तशी धमकी ही देण्यात आली आहे, या अंधभक्तांकडून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष व पँथर ऑफ सम्यक योद्धा संघटनेकडून कडून करण्यात आली आहे.

देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात असे उल्लेखिले आहे की, उत्तर प्रदेश गाजीपुर मध्ये राहणाऱ्या विशाल गाजीपूर व सपना बौद्ध यांनी “आया देश विक्रेता” हे गाणं गायिल्यामुळे अंधभक्तांकडून या गायकांना जीवे मारण्याची धमकी मिळत असून त्यांनी संबंधित पोलीस ठाणेत तक्रार पण दिली आहे.

त्या तक्रारीहून भारतीय दंडसंहिता व एस.सी, एस.टी कायद्याप्रमाणे 506 507 435 कलमनाव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, मात्र; या गायकांपुढे भीतीचे सावट निर्माण झाले आहे, त्यांचा स्टुडिओ सुद्धा अंधभक्तांकडून जाळण्यात आला आहे.गायक गायिका सध्या त्यांच्या राहत्या घरी नसून त्यांनी भीतीपोटी घर सोडले आहे, त्यांच्या जीविताला धोका आहे, उत्तर प्रदेश सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सदर कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे.या गायकांची 2 वर्षाचे मुल असून त्या मुलालचे भविष्य या घटनेमुळे अंधकारमय झाले आहे.

कोरोना सदृशय परिस्तिथीत यांना अन्यस्त्र लहान मुलाला घेऊन फिरावे लागते आहे, आंबेडकर विचारांच्या लोकांनी मदत तर करावीच परंतु सरकारचे परम कर्तव्य आहे की आपल्या जनतेला संरक्षित करणे,या पती पत्नी व त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची काळजी घ्यावी व संरक्षण द्यावे शिवाय त्यांच्या परिवाराला पण संरक्षित करावे व धमकी देणाऱ्या अंडभक्तांना कठोर शासन करावे.

अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे व पँथर ऑफ सम्यक योद्धा संस्थापक अध्यक्ष पूज्य बौद्ध भिक्षूं शिलबोधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश मुख्यमंत्री मा योगी आदित्यनाथ यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पँथर डॉ. राजन माक्निकर यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.