औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात गोळीबाराची घटना घडली.
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात गोळीबाराची घटना घडली. एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचं अपहरण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. रविवारी व्यापारी अखिलेश गुप्ता घरी जात असताना त्यांची कार अडवून तीन अपहरणकर्त्यांनी मिर्ची पूड टाकत तीन गोळ्या झाडल्या. सोबत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने अखिलेश गुप्ता यांचे प्राण वाचले. अखिलेश गुप्ता यांचं सिल्लोडला कापड आणि कृषीसेवा केंद्र आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणी अजिंठा पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

