पिंपरी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांना भीषणआग

0 झुंजार झेप न्युज

 

पिंपरी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांना  भीषण आग

पिंपरी पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या आगीत 7 वाहने जळून खाक झाली आहेत. तर, काही वेळानंतर स्फोट होऊ लागले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाली आहे.

पिंपरी पोलीस ठाणे हे अत्यंत वर्दळीच्या महामार्गावर आहे. बाजुलाच चिंचवड स्टेशन चौक असून काही अंतरावर पेट्रोल पंप देखील आहे. या आगीमुळे अन्य नुकसान तर होणार नाही ना, अशी भिती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी सुमारे 50 चारचाकी वाहने लावलेली आहेत. तर, सुमारे 100 हून अधिक दुचाकी वाहने आहेत. ही सर्व वाहने गुन्हेगारी कृत्यासाठी वापरण्यात आलेली असून कारवाई केल्यानंतर ताब्यात घेतलेली आहेत.

मोटारी आणि दुचाक्या असल्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने स्फोट होत आहेत. आगीने रौद्ररुप धारण केले असून आगीवर नियंत्रण घेण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी रावाना झाले आहेत. तब्बल 20 मिनिटांपूर्वी ही आग लागलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.