Election Commission : निकालांच्या धामधुमीत निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद, काय घोषणा करणार?
2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीला सर्वाधिक 80 जागा मिळाल्या होत्या. तर दुसऱ्या नंबरवर नितिशकुमार यांचा जेडीयू पक्ष होता. त्यांनी 71 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला 53, काँग्रेसला 27, एलजेपीला 2, आरएलएसपीला 2, हम पार्टीला 1 आणि 7 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. 2015 मध्ये नितीश कुमार यांची जेडीयू, लालू प्रसाद यादवची आरजेडी आणि काँग्रेसने महागठबंधन बनवून बीजेपी, आरएलएसपी आणि एलजेपीच्या गठबंधन विरोधात विजय मिळवला होता.
ताज्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत मोरेना, सुमौली, दिमानी, अम्बाह, मेहगांव, गोहड, ब्यावरा आणि हाट पिपिलया विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. तर सुवासरा, सांवेर, बदनावर, नेपानगर, मांधाता, आगर, सांची, अनूपपुर, मल्हारा, सुरखी, मुंगौली, अशोक नगर बमूरी, ग्वालियर, ग्वालियर ईस्ट जागांवर भाजप आघाडीवर आहे.

