मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा

0 झुंजार झेप न्युज

 

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Traffic jam mumbai pune expressway due to the diwali vacation at khalapur toll plaza

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर तीन ते चार किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एक तासापासून वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.


मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कारण दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत. विशेषतः चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. अशातच चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्यांची गर्दी मुंबई-पुणे महामार्गावर झाली असून खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली झाली आहे. तसेच, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.


दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जी नियमावली प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात आली होती. ती आता शिथील झाली आहे. त्यामुळे लोकांचा प्रवासही वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. याचा ताण मुंबई-पुणे महामार्गावर आल्याचं चित्र दिसत आहे.


उद्यापासून मंदिरं उघडण्यास प्रशासनाची परवानगी 


दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचं म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच पालन करावं लागणार आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री यांनी म्हटलं की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.