वर्ध्यात पोलिसांची गाडी भररस्त्यात पलटी, तीन पोलिसांसह पाच जण गंभीर जखमी
वर्धा तालुक्यातील सुकळीबाई परिसरात हा भीषण अपघात झाला. यावेळी पोलिसांची गाडी पलटी होवून तीन पोलिसांसह पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
वर्धा : वर्ध्यात संशयिताला घेवून जाताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला (Wardha Police Accident). या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वर्धा तालुक्यातील सुकळीबाई परिसरात हा भीषण अपघात झाला. यावेळी पोलिसांची गाडी पलटी होवून तीन पोलिसांसह पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह संशयित आरोपी आणि खाजगी वाहन चालक जखमी झाले आहेत
वर्ध्यातील सुकळी बाई येथे पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात पोलिसांची गाडीच पलटी झाली असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातमधून आयटी प्रकरणात एका संशयिताला घेवून येताना सुकळी बाईजवळ ही घटना घडली आहे. सावंगी पोलिसात दाखल असलेल्या सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी अहमदाबाद येथून परत येताना हा अपघात झाला.
गुजरातच्या अहमदाबाद येथून आयटी अॅक्टअंतर्गत तपास करुन येत असताना पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला. रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, पोलीस नाईक विजय पंचटीके, पोलीस शिपाई सुरज जाधव, खाजगी वाहन चालक हितेंद्र रावल, संशयित आरोपी अमित अकबर ललानी हे जखमी झाले आहेत. जखमींना वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


