नागपुरात चालकाची मुजोरी, कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली

0 झुंजार झेप न्युज

 

नागपुरात चालकाची मुजोरी, कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली

नागपुरात एका मुजोर कार चालकाने वाहतूक हवालदाराला त्याच्या कारने उडवण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर घेत चालकाने सक्करदरा भागातून छोटा ताजबाग परिसराकडे गाडी पळवली.


नागपूर : नागपुरात गुंड किती मग्रूर झाले आहेत याचे धक्कादायक उदाहरण सक्करदरा परिसरात समोर आले. एका कार चालकाने वाहतूक हवालदाराला त्याच्या कारने उडवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत वाहतूक हवालदार अमोल चिद्गमवार यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. याच महिन्याच्या सुरुवातील पुण्यातही असाच प्रकार घडला होता. कारवाई टाळण्यासाठी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर घेऊन जीवघेणा प्रवास केला होता.


नागपूरच्या सक्करदरा भागात काल (29 नोव्हेंबर) संध्याकाळी नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून गडद काळ्या फिल्म्स असलेल्या कारवर कारवाई केली जात होती. त्याचवेळी वाहतूक हवालदार अमोल चिद्गमवार एम एच 31 डी वी 3222 क्रमांकाची कार काचेवर गडद काळ्या फिल्म्स लावलेली दिसली. अमोल चिद्गमवार यांनी त्या कारला थांबण्याचा इशारा केला. परंतु चालक आकाश चव्हाणने कार थांबवण्याचा सोंग करत कार रस्त्याच्या कडेला वळवली. त्यामुळे ट्रॅफिक हवालदार चिद्गमवार काहीसे निर्धास्त झाले. मात्र अचानकच आकाश चव्हाणने कारची गती वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिद्गमवार यांनी समोर येत कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने गती आणखी वाढवत चिद्गमवार यांना थेट कारच्या बॉनेटवर घेत सक्करदरा भागातून छोटा ताजबाग परिसराकडे कार पळवली.


अमोल चिद्गमवार बॉनेटवर असताना कार रस्त्यावरुन पळू लागली. अनेकांनी ते दृश्य पाहिले. थेट पोलिसाला उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकाश चव्हाणने छोटा ताजबागकडे जाताना रस्त्यात अनेक दुचाकीस्वारांनाही कारने धडक दिली. त्यामध्ये अनेक दुचाकीस्वार खाली कोसळले. सुदैवाने त्यांना ही मोठी इजा झाली नाही. छोटा ताजबागजवळ पोलिसांनी त्या कारला अडवले. तेव्हा कारमध्ये आकाशसोबत एक तरुणी बसल्याचंही दिसलं.


पोलिसांनी कार चालक आकाश चव्हाणला हत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा टाकण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कार चालक आकाश चव्हाण हा नागपूरच्या कुख्यात शेखु टोळीचा सदस्य असून त्याच्यावर याआधीही मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे नागपुरात रस्त्यावर फिरणारे गुंड पोलिसांना आणि कायद्यालाही जुमानत नाही तर ते सामान्य नागरिकांना किती त्रास देत असतील याची कल्पना सहज करता येते.


नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.