केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रकृती स्वास्थ चांगले लाभावे यासाठी भिक्खू संघ व अभिनेत्री पायल घोष व रिपाई कार्यकर्ते पदाधिकार्यानी केली सामूहिक बुद्ध वंदना
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्यमंत्री मा.ना रामदासजी आठवले साहेब व राष्ट्रीय नेत्या महिला आघाडी मा.सौ.सिमाताई रामदास आठवले यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना आज किंवा उद्या रूग्णालयातुन डिस्चार्ज मिळणार आहे. परंतु डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आणखी काही दिवस विश्रांती घेणार असून त्यानंतर पूर्वीप्रमाणे आपल्या सर्वांसोबत असतील. अशी माहीती सौ. सिमाताई आठवले यांस कडून मिळाली आहे.
साहेबांच्या आणि ताईसाहेबांच्या आजारपणात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व जनतेने ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्या सर्वांचे मनापासून आभार. आपणा सर्वांच्या सदिच्छा व प्रार्थनेमुळे तसेच रुग्नालयातील वैद्यकीय स्टाफ यांचे प्रयत्न यांच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली. याबद्दल. सर्वांचेच मनापासून आभार.

