भाजप कार्यालयात बिहार निवडणूकीचा विजयोत्सव; महापौरांकडून आमदारांना विजयाचा पेढा…

0 झुंजार झेप न्युज

 भाजप कार्यालयात बिहार निवडणूकीचा विजयोत्सव; महापौरांकडून आमदारांना विजयाचा पेढा…

पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :-  बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपा + जेडीयू आघाडीची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरु असून जवळ-जवळ भाजपा + जेडीयू आघाडीचा विजय स्पष्ट झाला आहे. बिहार विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त जागा निवडून आल्यामुळे भाजप क्रमांक १ चा पक्ष म्हणून पुढे आला आहे.

सर्व देशभरात बिहार निवडणुकीचा विजय साजरा होत असताना शहराच्या वतीनेही पक्ष कार्यलयात हा विजय साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भाजपा शहराध्यक्ष आ. महेशदादा लांडगे यांना विजयी पेढा भरवून बिहार निवडणूकीत पक्षाचा विजय साजरा केला.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, मा.नगरसेवक सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, सरचिटणीस विजय फुगे, शहर उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, भाजयमोचे उपाध्यक्ष जवाहर ढोरे, अंकुशराव लोंढे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, संजय परळीकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखिल बिहार विजयाचा आनंद साजरा केला.

पुन्हा एकदा विकासपुरुष मा. नरेंद्रजी मोदी यांचे खंबीर नेतृत्व व लोकपयोगी योजनांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केल्या मुळेच जनतेने भाजपाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे’ असे प्रतीपादन शहराध्यक्ष आ.महेश लांडगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.