चऱ्होलीतील द्वारका हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांचा छापा
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- दिघी-आळंदी रोडवर च-होली बुद्रुक येथे द्वारका फॅमिली गार्डन या हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू, बिअरची विक्री केली जात आहे. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी द्वारका हॉटेलवर छापा मारला.
त्यामध्ये आरोपी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून १० हजार २४० रुपयांची रोकड, ३९ हजार ४९९ रुपयांच्या देशी-विदेशी दारू, बिअरच्या बाटल्या असा एकूण ४९ हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हॉटेल चालक, मालकाच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हॉटेलमध्ये काम करणारे चार वेटर आणि ११ ग्राहक यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये आर्थिक दंड वसूल करण्यात आला आहे. शाम तापकीर, संतोष जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
