मुंबईसह राज्यभर थंडीची लाट, 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

0 झुंजार झेप न्युज

 

मुंबईसह राज्यभर थंडीची लाट, 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

आज बुधवारी मुंबईत 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 


मुंबई : राज्यात आता थंडीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. भर दिवसाही मुंबई , पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये हलकी थंडी  जाणवायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये हंगामातील आतापर्यंतचं सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं आहे. सांताक्रूझ वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची  नोंद करण्यात आली आहे. तर आज बुधवारी मुंबईत 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. भारत हवामान खात्याच्या (IMD) पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासूनच ईशान्य दिशेने वेगाने थंड वारे वाहतील. यामुळे रात्रीच्या तापमानात घट होईल तर गुरुवारपासून वाऱ्याची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

होसाळीकर यांनी हवामानासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. यानुसार आज परभणी विद्यापीठ इथं किमान तापमान 8.0 अंश डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. आज राज्यात सर्वात कमी नोंद परभणीमध्ये झाली आहे. तर यवतमाळमध्ये 10.0 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.


एकीकडे नाशिक शहरातही थंडीचा कडाका पाहायला मिळाला. नाशिकमध्ये तापमान 11.8 पर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. शहरात थंड वारे वाहत असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुक्यांची चादर पसरली आहे. दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाडचा पाराही घसरला आहे. थंडीच्या हंगामातील नीचांकी अशी 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद कुंदेवाडी इथल्या गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात करण्यात आली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऱ्यात सतत चढ-उतार होत असताना मंगळवारी 10 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती तर आज 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निच्चांकी नोंद झाली आहे. दररोज किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने निफाड तालुका चांगला गारठून निघाला आहे. या गारठ्यातून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.