पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद

0 झुंजार झेप न्युज

 

पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद

कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम शिवाजी पाटील आज पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आलं आहे.


कोल्हापूर : भारतमातेने आज (21 नोव्हेंबर) पाकिस्तानच्या हल्ल्यात आपला आणखी एक सुपूत्र गमावला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा याठिकाणचे संग्राम शिवाजी पाटील यांना पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलं. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आल्याने पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. काबाडकष्ट करुन शिवाजी पाटील यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं. अतिशय हळवा आणि मनमिळावू असा संग्राम यांचा स्वभाव होता. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करुन संग्राम यांनी आपलं शरीर मजबूत केलं. प्रचंड कष्ट करण्याचं बाळकडू संग्राम यांना घरातूनच मिळालं.


मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडे परतले नव्हते. फोनवरुनच घरातील सगळ्याची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्या आधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. संग्राम यांच्या मागे आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.


गेल्याच आठवड्यात म्हणजे भाऊबीज दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी इथल्या शहिद ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे एक जवान ऐन दिवाळीत आणि दुसरा जवान दिवाळी संपताच शहीद झाला आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूरच्या दोन सुपूत्रांना सीमेवर वीरमरण आलं आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट आहे. आणखी किती सुपूत्र आपण गमावायचे? आणखी किती शहीदांना मानवंदना द्यावी लागणार आहे? असा सवाल देखील करण्यात येत आहे.


हे ही वाचा 

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने निर्बंधांना सुरुवात; कोणत्या शहरात कर्फ्यू, कुठे शाळा बंद?


अनेक जिल्ह्यातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत प्रश्नचिन्ह


नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.