कल्याण रेल्वे पोलिसांची चमकदार कामगिरी, एका महिन्यात 1 कोटींचे 350 मोबाईल नागरिकांना परत

0 झुंजार झेप न्युज

यामध्ये हरविलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल, फटका मारुन लुटलेले मोबाईल यांचा समावेश आहे.

 कल्याण : लोकलने प्रवास करताना जर तुमची एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली, तर ती परत मिळेल याची काही खात्री नसते. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी गेल्या महिन्याभरातील चोरीला गेलेले किंवा हरवलेले जवळपास 350 मोबाईल परत केले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत जवळपास 1 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 

कल्याण रेल्वे पोलिस अंतर्गत कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूर असा 84 किलोमीटरचा भाग येतो. या दरम्यान लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. लॉकडाऊनपूर्वी आणि अनलॉकमध्ये काम सुरु करण्यात आले. मात्र या दरम्यान नागरिकांच्या वस्तू मोठ्या प्रमाणात हरवल्या, तर काहींच्या वस्तू चोरीला गेल्या. यानंतर कल्याण जीआरपीने वस्तू परत करण्याचे काम केले.

यानुसार कल्याण जीआरपी पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात जवळपास एक कोटीचे ३५० मोबाईल परत केले आहेत. यामध्ये हरविलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल, फटका मारुन लुटलेले मोबाईल यांचा समावेश आहे.

दरम्यान यातील काही मोबाईल हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे न्यायालयाद्वारे नागरिकांना ते परत मिळणार आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांना मोबाईल परत करण्याचे काम सुरु आहे.

यासंदर्भात कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मिक शार्दुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात 350 मोबाईल परत केले आहेत. यातील काहींचे पत्ते शोधून त्यांना घरी जात चोरीला किंवा हरविलेल्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. तर काहींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या वस्तू परत केल्या आहेत.

वर्षभरात चोरी आणि हरविलेल्या 1700 वस्तू परत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीविषयी समधान व्यक्त केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.