राबोडी येथील मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या खऱ्या आरोपींना शासन व्हावे यासाठी मनसेचे आंदोलन..
ठाणे-: राबोडी येथील मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची राबोडी परिसरात मोटारसायकलवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
अद्याप पोलिसांकडून आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलं नसून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी या करता आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मनसेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये असलेलं भीती पोलिसांनी काढली पाहिजे. आज अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार प्रत्येक मनसैनिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जमील शेखला न्याय मिळावा आणि खऱ्या सुत्रधारस अटक व्हावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.

