या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे.
राजस्थान : भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली.
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कुटुंबियांसह रणथंबोरला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अझरुद्दीनसोबत आलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर मोहम्मद अझरुद्दीन हे दुसर्या वाहनाने हॉटेलवर पोहोचले.

