भोसरीत पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून चार पिस्तुलं जप्त…
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातीलक्री भोसरी परिसरातून पिस्तुल विसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ७५ हजारांची चार पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत.
रूपेश उर्फ संतोष सुरेश पाटील, वय- २८ रा. भोसरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी रुपेशवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म ऍक्ट असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. रुपेश याच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
