पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे भूमिपूजन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित आहेत. जुन्या संसद भवनात जागेची कमतरता आणि भविष्याच्या दृष्टीने मर्यादा असल्याने नवी इमारत उभारण्यात येत आहे. नवी संसद इमारत त्रिकोणी रचनेत असेल. सध्याच्या राष्ट्रपती भवनापासून थेट इंडिया गेटपर्यंत 3 किलोमीटर परिसरात राजपथाच्या दोन्ही बाजूला इमारती उभारल्या जाणार आहेत.

