पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची दुसरी लाट नाहीच..
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २६ डिसेंबर) रोजी ८२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील व बाहेरील एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९६०४३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२६७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७४५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

