आत्महत्या, हत्या आणि चोरीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.
पिंपरी चिंचवड : आत्महत्या, हत्या आणि चोरीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. फेसबुकवर मैत्री करुन तरुणीने फसवल्यामुळे आळंदी येथील 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आकाश दादाभाऊ पोकळे असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. संगीत उर्फ प्रिया राजेंद्र देशमुख असे आरोपी तरुणीचे नाव आहे.
आकाश आणि प्रिया या दोघांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. दोघांमध्ये चॅटिंग होत राहिल, त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तरुणीकडून शारिरीक सुखाची आणि पैशाची होऊ लागली. त्यामुळे आकाश तणावात होता. त्यामुळे या तणावातच आकाशने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.
चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या इसमाची सांताक्रूझमध्ये हत्या
चोरी करण्याच्या इराद्याने सांताक्रूझमधील मुक्तानंतर पार्कमध्ये आलेल्या इसमाला लोकांनी त्याला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसानी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरुन 6 आरोपींविरोधात तक्रा दाखल केली आहे. सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 302, 342, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला असून याप्रकरणी तपास सुरु आहे.
नागपुरात महिलेचा जळून मृत्यू
नागपुरात एका महिलेचा जळून मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून शबाना असं मृत महिलेचं नाव आहे. महिला तिच्या प्रियकराला भेटायला गेली असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान या महिलेला पेटवण्यात आलं होतं की तिने स्वतः पेटवून घेतलं होतं, याबाबत संभ्रम आहेत. त्यामुळे पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. महिलेने मृत्यूपूर्वी दिलेली माहिती आणि पोलीस तपासात समोर आलेली तथ्य यात तफावत आढळल्याने वास्तव शोधण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.
गर्लफ्रेंडची हौस भागवण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या मजनूला बेड्या
गर्लफ्रेंडची हौस भागवण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या पंढरपुरातील एका अट्टल चोराला पोलिसांनी पकडले आहे. महादेव सगर असे या चोरी करणाऱ्या मजनूचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सात मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
मिरज येथील सोपान बंडगर हे मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने पंढपूरला आले होते. शहरातील काळा मारूती परिसरात आपली मोटारसायकल लावून ते वासकरवाडा येथे जागरासाठी गेले होते. सकाळी आपली गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान अनेक गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला महादेव सगर हा मोटारसायकल वरून जात असताना पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्याने आणखी सात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
गर्लफ्रेंडची हौस भागवण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी मोटारसाकली चोरून त्या आठ दहा हजार रूपयांना विकल्याचे आरोपी महादेव सगर याने पोलिस तपासात सांगितले. गर्लफ्रेंडची हौस पुवरण्याच्या नादात आरोपी महादेव सरगरला आता जेलची हवा खावी लागणार आहे.
कोल्हापुरात चेन स्नॅचिंगच्या घटनांत वाढ, नागरिकांमध्ये भीती
कोल्हापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चेन स्नॅचिंगच्या घटनांतही वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभरात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. रमणमळा आणि राजेंद्रनगर परिसरात हे प्रकार घडले आहेत. शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

