संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी, छातीत त्रास सुरु झाल्यानं उद्या शस्त्रक्रिया

0 झुंजार झेप न्युज

 

संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी, छातीत त्रास सुरु झाल्यानं उद्या शस्त्रक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.


लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करणार आहेत. आज सायंकाळी संजय राऊत लिलावती रूग्णालयात दाखल होणार असून सुरूवातीला अँजिओग्राफी केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल.


आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.