Sunny Deol Corona | अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओलला कोरोनाची बाधा
बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हिमाचल प्रदेशातील आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल खासगी कामानिमित्त हिमाचल प्रदेशात आले होते. ते कुलू जिल्ह्यातील मनालीजवळ एका फॉर्म हाऊसमध्ये थांबले होते.
काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर आराम करण्यासाठी ते मनालीतील फॉर्म हाऊसमध्ये आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राहत होते. मात्र उद्या 3 डिसेंबरला सनी देओल हे एका मित्रासोबत मुंबईत परतणार होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सनी देओलने भाजपात प्रवेश केला. त्याला पंजाबमधील गुरदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना इथून खासदार होते. पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत इथून काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी भाजपने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी सनी देओलला मैदानात उतरवलं होतं. या मतदारसंघातून सनी देओलने घसघशीत मतांनी विजय मिळवला.
नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

