पालघर, सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको, राजधानी एक तास रोखली

0 झुंजार झेप न्युज

 

पालघर, सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको, राजधानी एक तास रोखली

डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या 3 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पालघर : पश्चिम रेल्वेवरील पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी (Palghar Passengers Rail Roko) आज रेल रोको आंदोलन केले. यावेळी प्रवाशांनी 1 तास मुंबईकडे जाणारी राजधानी रोखून धरली. डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या 3 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी हे आंदोलन पुकारलं

पश्चिम रेल्वे वरील मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन रद्द केल्याने दररोज पहाटे, सकाळी कामावर जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे. याला कंटाळून संतप्त प्रवाशांनी पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात गाड्या अडवल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आधीच नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेतील तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या रेल्वे गाड्या रेल्वेने अचानक बंद केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. कामावर जाण्यास दुसरे साधन नसल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बुधवारीपहाटेपासून पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात ट्रेन रोखून धरल्या.

नोकरीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन रोखून धरली. त्यानंतर पालघर रेल्वे स्टेशन मास्टरने प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठविण्याचे, तसेच तिथे जावून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अडविण्यात आलेली लोकल मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली.

दरम्यान, सफाळे रेल्वे स्थानकातील लोकल प्रवाशांनी सर्व ट्रेन पूर्ववत होईपर्यंत रोखून धरण्याल्याने पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील सर्व गाड्या विविध रेल्वे स्थानकात अडकून पडल्या.

दरम्यान, काही प्रवासी मुंबई सेंट्रल कार्यालयात जावून ट्रेन रद्द करण्याविरोधात रेल्वे निवेदन देणार आहेत.

नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.