शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चा फोल, सातव्या दिवशीही आंदोलन सुरुच, दिल्लीतील आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका

0 झुंजार झेप न्युज

 

शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चा फोल, सातव्या दिवशीही आंदोलन सुरुच, दिल्लीतील आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 7 दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. याचा फटका नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना बसतोय. कारण पंजाबवरुन येणारा गहू आणि तांदूळ अडकून पडल्यानं रेशन दुकानावरील व्यवस्था कोलमडून पडली आहे.


नाशिक: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरुच आहे. मंगळवारी केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधील चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. त्यांमुळे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. महत्वाची बाब म्हणजे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका नाशिक जिल्ह्याला बसताना पाहायला मिळतोय.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 7 दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. याचा फटका नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना बसतोय. कारण पंजाबवरुन येणारा गहू आणि तांदूळ अडकून पडल्यानं रेशन दुकानावरील व्यवस्था कोलमडून पडली आहे. रेशनचे धान्य अडकल्यानं नाशिक जिल्ह्यातील 6 तालुके प्रभावित झाले आहेत. जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ यासह अन्य तालुक्यांमध्ये रेशन दुकानांवर धान्य उपलब्ध नाही. तर नाशिक शहरातही रेशन दुकानांवर गहू आणि तांदुळाला तुटवडा जाणवत आहे. आंदोलन लांबल्यास गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

मंगळवारच्या बैठकीत काय झालं?

देशभरातील जवळपास 35 शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना MSPवर प्रेझेंटेशन देण्यात आलं. सोबतच बाजाराच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी MSPला कायद्याचा भाग बनवलं जाणार का? हा एकच प्रश्न शेतकरी संघटनांनी विचारला. तीन तास चाललेल्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. दुसरीकडे बैठक सकारात्मक झाली, 3 डिसेंबरला पुन्हा चर्चा होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

पुढे आंदोलनाची दिशा काय?

आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डरसह अन्य जागांवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच असेल. इतकच नाही तर पंजाब आणि हरियाणातून अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. त्यामुळे आंदोलनात शेतकऱ्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.