भारतात Gmail, YouTube, Google Drive डाऊन, नेमकं कारण काय?
भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे.
मुंबई : भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे. ई-मेलसोबतच यू-ट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत (Gmail and YouTube down in India).
भारतात जीमेल आणि युट्युब सेवा डाऊन झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटर, गुगल, युटुयब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

