विठ्ठल नगर येथील राहुलभाऊ भोसले युवा मंच यांच्या वतीने 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठलनगर पुनर्वसन येथे प्रबोधनकार शारदा मुंडे प्रस्तुत"होय मी सावित्री बोलते या एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठल नगर येथील राहुलभाऊ भोसले युवा मंच यांच्या वतीने 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठलनगर पुनर्वसन येथे प्रबोधनकार शारदा मुंडे प्रस्तुत" होय मी सावित्री बोलते !"या एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते,या नाटयप्रयोगाच्या माध्यमातून शारदा मुंडे यांनी सावित्रीमाईंचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला,स्थानिक महिलांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बुध्दवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली,सावित्रीमाईंचा जीवनपट ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले, यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किशोर गवळी,अशोक देवकर,सुनिता पाटोळे,स्नेहलता पाटोळे,ज्ञानोबा धावारे,संजय जाधव,विनोद गायकवाड,महादेव आडसुळे,बापू सावंत,बालाजी थोरात,मिरा वाघमारे,संदेश पाटोळे यांनी परिश्रम घेतले.

