मुंबई क्राईम ब्रँचने 300 लोकांपेक्षा जास्त लोकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे.
मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन झालं. त्यादरम्यान बर्याच लोकांच्या नोकर्या गेल्या (Job Fraud Gang Mumbai). बेरोजगार आणि गरजू लोक नोकरीच्या जाहिरातींवर असलेल्या प्रत्येक क्रमांकावर संपर्क साधून नोकरीच्या शोधात होते. लोकांच्या या मजबुरीचा फायदा घेत काही लोकांनी नोकरीच्या बनावट जाहिराती दिल्या आणि परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली मोठ्या संख्येत कामगार वर्गाच्या लोकांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला (Job Fraud Gang Mumbai).
मुंबई क्राईम ब्रँचने 300 लोकांपेक्षा जास्त लोकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी अडीचशेहून अधिक पासपोर्ट, बनावट व्हिसा आणि बनावट नियुक्तीपत्रे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तारक मंडळ, जयंतकुमार मंडळ, सुफुद्दीन शेख, मयुनिद्दीन गोल्दर, अब्दुल शेख आणि मोइनुद्दीन शेख अशी आहेत.
अटक आरोपींनी मुंबईतील मालाड भागातील एव्हर शाईन मॉलमध्ये जॉब कन्सल्टन्सी ऑफिस उघडले. जेथे त्यांनी मुलाखतीसाठी आणि उर्वरित औपचारिकतेसाठी लोकांना बोलावले होते. हे लोक एका माणसाकडे 80 हजार ते 1 लाख रुपयांची मागणी करत असत. एकदा ज्यांच्याकडून त्यांना पैसे मिळून जात होते. त्यांना हे लोक टाळाटाळ करायला सुरुवात करत होते.
आरोपींनी नोकरीच्या जाहिरातीबद्दल एक पॅम्फ्लेट बनविला होता, ज्यावर त्यांनी दहावीपासून पदवीपर्यंत लोकांना रशियामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखविला होता. या लोकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हे जाहिरात खूप व्हायरल केले होते. त्यांचे लक्ष्य उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मधले तरुण आणि बेरोजगार होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही जाहिरात व्हायरल झाल्यामुळे या लोकांना शेकडो गरजू लोकांचे कॉल येऊ लागले (Job Fraud Gang Mumbai).
डिसीपी पठाण म्हणाले की, या लोकांना मुंबईत नोकरी देण्याच्या नावाखाली टोळी लोकांची फसवणूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक त्या मॉलमध्ये या प्रकारची रोजगार एजन्सी चालवायची परवानगी नाही आणि हे लोक बेरोजगारांना फसवत आहेत. पश्चिम बंगालमध्येही या लोकांनी सुमारे 100 जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे आणि स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी आपली कार्यालये बंद केली. मुंबईत येऊन इथे फसवणूक करण्यास सुरवात केली.

