आडगावमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नाशिक: आडगावमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच खून केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आडगाव पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या घटनेतील सत्य समोर आले. पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकाराला बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नाशिकच्या आडगाव परिसरातील एका महिलने तिच्या अनैतिक संबधात अडथळा ठरतो म्हणून पोटच्या पोराचा जीव घेतला असल्याचं उघडकीस आलं आहे. 6 वर्षाच्या मुलाचा तिच्या जन्मदात्या आईने आणि तिच्या प्रियकरानं खून केला आहे.
6 वर्षाच्या चिरमुरड्याचा जन्मदात्या आईने आणि तिच्या प्रियकराने केला खून केला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. चिमुरड्याच डोकं भिंतीवर आपटून आईनेच त्याचा जीव घेतल्याचं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
अनैतिक संबंधासाठी आईनेच पोटच्या पोराचा जीव घेतल्याची मन हेलावणारी घटना आडगाव परिसरता घडली आहे. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी संबंधित महिला आणि तिचा प्रियकर यांना अटक केली असून त्यांची पुढील चौकशी करण्यात येत आहे.

