सर्वसामान्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध : सौ शुभांगी ताई भोसले
मी शुभांगी राजेंद्र भोसले वार्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहे .माझे आजत सासरे बाबुराव सखाराम भोसले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात वाढल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले ,शाहू महाराज, आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आमच्या घराण्यावर आहे. तोच वारसा मी पुढे चालवत आहे. माझे पती राजेंद्र भोसले हे विद्यमान सरपंच म्हणून मान ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धतीने गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काम केले आहे .त्यांनी विविध विकास कामे केलेली आहेत . व्यायामशाळा ,ड्रेनेज लाईन ,समाज मंदिर, स्टेट लाईट ,इतर विविध विकास कामे त्यांनी केली आहेत. मी पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणी व महिला भगिनी च्या समस्या सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. तरी माझी निशाणी शिलाई मशीन हे चिन्ह असून सुजन मतदार बंधु भगिनींनो मला शिलाई मशीन या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे आणि समाजसेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करते जय शिवराय जय भिम

