धक्कादायक! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा

0 झुंजार झेप न्युज

 या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नाशिक : जन्मदात्यांनीच पोटच्या लेकरांची हत्या केल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. असाच एक भयंकर प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे. अनैतिक संबंधात आड येत असल्याने बापाणेच पोटच्या मुलाचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पित्याला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या वैद्वनगर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. आज पहाटेच्या सुमारास वडिलांनीच पोटच्या पोराची गळा आवळून हत्या केली. निलेश माळवाड असं मयत मुलाचं नाव असून प्रभाकर माळवाड असं आरोपी पित्याचं नाव आहे. प्रभाकर यांचे बाहेर अनैतिक संबंध होते. पण हे मुलाला समजल्यानंतर तो नात्याच्या आड येत होता. म्हणून पित्याने पोटच्या पोराचाच काटा काढला.

स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी वडील प्रभाकर माळवाडला मुंबई नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलीस आरोपीच्या कुटुंबाची आणि शेजारच्यांशीही चौकशी करणार असून प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.