एसटीचा फलक बदलून धुळे ते संभाजीनगर करा, मनसेची परिवहन आगारप्रमुखांकडे मागणी

0 झुंजार झेप न्युज

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी करण्यात आलीय.

 धुळे : मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या नेतृत्वात धुळे एसटी डेपो येथे धुळे ते औरंगाबाद जाणाऱ्या गाडीचे नामफलक बदलून त्याजागी धुळे ते संभाजीनगर फलक लावण्यात आला. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी करण्यात आलीय. तसेच मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या हस्ते धुळे ते संभाजीनगर असे नाव असलेले 10 फलक आगारप्रमुख यांना भेट देण्यात आले आणि यापुढे या नामाचेच फलक वापरावेत, असा मनसेच्या वतीने गर्भित इशारा देण्यात आला. मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. देशमुख यांनी नमूद केले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, असे जाहीर केले होते. परंतु 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतरसुद्धा हे नामांतर होऊ शकले नाही.

म्हणून धुळ्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आघाडी सरकारचा जाहीर निषेध

तसेच 2014 साली देखील युतीची सत्ता आल्यावर त्या वेळीदेखील नामांतर होऊ शकले नाही आणि आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असताना देखील औरंगाबादचे संभाजीनगर हे नाम होऊ शकत नाही, त्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. म्हणून धुळ्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आघाडी सरकारचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. तसेच ऐदलाबादचे पूर्वीचे नाव बदलून मुक्ताईनगर होऊ शकते, मग औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही ?, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

मनसे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनानुसार सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, संतोष मिस्त्री, मनसे एसटी कामगार सेनेचे विभाग अध्यक्ष गणेश गायकवाड, मनसे धुळे तालुका अध्यक्ष नंदू पाटील, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश दुसाने, अनिल खेमणार, साहिल खान, अविनाश देवरे, रोहित नेरकर, नरेश हिरे, बापू ठाकूर, अक्षय शिंदे, भालचंद्र धनगर, हरीश जगताप. आदी पदाधिकारी उपस्थित होते.

औरंगाबादची बस आडवून संभाजीनगरचा बोर्ड, आता रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाढवली

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यात यावे, यासाठी शिवसेना, भाजप आणि मनसे आक्रमक झालीय. औरंगाबादला जाणाऱ्या बसेसवरील बोर्डांवर संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला होता. नामांतराचा वाद पुन्हा उफाळल्यानं रेल्वेनं औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यानं दिली होती. नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे विभागाकडून सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.