‘गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना ‘आपडा’ म्हटले तर तुमचा तीळपापड का झाला?’

0 झुंजार झेप न्युज

 उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यामुळे ते गुजराती माणसाला ते ‘आपडा’ वाटणारच, असेही हेमराज शाह यांनी म्हटले.

मुंबई: येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत होणााऱ्या शिवसेनेच्या गुजराती मेळाव्याच्या (Shivsena Gujrati Melava) पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या ‘जिलेबी-फाफडाचे’ राजकारण चांगलेच तापले आहे. आपल्या हक्काच्या व्होटबँकेला हात घातल्यामुळे सावध झालेले भाजप नेते शिवसेनेला टोमणे मारत आहेत. मात्र, गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना आपडा म्हटले तर तुमचा तीळपापड का झाला, असा सवाल आता शिवसेनेचे संघटक हेमराज शाह यांनी उपस्थित केला आहे.

हेमराज शाह यांच्या हे शिवसेना संघटक असून त्यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता शाह हे भाजप नेत्यांच्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले. 1992-1993 च्या दंगलीवेळी शिवसेनेने गुजराती बांधवाना मदत केली, त्यांचे संरक्षण केले. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्वधर्मीयांना आपलेपणाने वागवल्याचे हेमराज शाह यांनी म्हटले.

मोदींचे नाव पुढे करुन गुजराती बांधवांना फक्त मतांसाठी वापरले’

भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे करून फक्त मतांपुरते गुजराती बांधवांना वापरले. ‘आपडो माणस’ म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले हेच खरे आहे ना? असा सवाल हेमराज शाह यांनी भाजप नेत्यांना विचारला.

मुंबईतील गुजराती समाजाचे नेते भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे. गुजराती माणुस स्वाभिमानी आहे. भाजपने त्याला स्वत:ची जहागीर समजू नये. उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यामुळे ते गुजराती माणसाला ते ‘आपडा’ वाटणारच, असेही हेमराज शाह यांनी म्हटले.

‘मालवणचो खाजो भी आमचो आणि जलेबी-फापडा भी आपडो’

मुंबई महानगरापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी गुजराती मतदारांना साद घालणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील मतदारांना गृहीत धरण्याच्या शिवसेनेच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. ‘कोकण म्हणजे आम्हीच’, असा अहंकार असणाऱ्या पक्षाचे वस्त्रहरण सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी शेलार यांनी शिवसेनेच्या ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या नव्या टॅगलाईनविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर आशिष शेलार यांनी, मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो’, अशी टिप्पणी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.