प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून?; पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली

0 झुंजार झेप न्युज

 मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्रं आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्रं आहे. विरोधी पक्षनेतेपद भाजपला मिळण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असून या निमित्ताने दोन्ही जुने मित्र जवळ येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असून तेव्हापासून काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत आहेत. आता पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद या वादाला कारणीभूत ठरलं आहे. पालिकेत काँग्रेसला दाबण्यासाठी शिवसेनेने नवी खेळी सुरू केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यास शिवसेना तयार झाली आहे. आमच्यावर दबाव टाकण्यासाठी शिवेसेना ही खेळी खेळत असून दोन्ही जुने मित्र या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेतेपद मिळावं म्हणून भाजपने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून कोर्टात त्यांची केस सुरू आहे. पण आता याप्रकरणात सेना भाजपला मदत करण्यास तयार झाली असून सेनेच्या या खेळीला आम्ही बळी पडणार नाही, असं रवी राजा यांनी स्पष्ट केलं.

प्रस्तावांबाबत गौप्यस्फोट

स्थायी समितीत येणाऱ्या प्रस्तावांवरून रवी राजा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्थायी समितीत कोणताही प्रस्ताव आला की हा प्रस्ताव वरून आला असं शिवसेना सांगत असते. वरून म्हणजे नेमका कुठून? मंत्रालयातून प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेश आला की वर्षावरून हे मात्र शिवसेना सांगत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. पालिकेच्या प्रस्तावामध्ये मंत्रालयातूनच हस्तक्षेप होत असल्याचा अप्रत्यक्ष दावाच रवी राजा यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.