स्थायी समितीच्या सभागृहात सत्कार...
पिंपरी चिंचवड:महानगरपालिकेच्या नावलौकिकात भर पडणारी कामगिरी केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक यांचा स्थायी समितीच्या सभागृहात सभापती संतोष अण्णा लोंढे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सदस्य राजेंद्र लांडगे, शशिकांत कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगरसचिव उल्हास जगताप आदी उपस्थित होते.
प्रफुल्ल पुराणिक यांनी गेल्या तीन वर्षात महानगरपालिका निवडणुक, विधानसभा, लोकसभा निवडणुका तसेच थोर महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच समाजप्रबोधन पर्वात सातत्याने केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले
