महाराष्ट्राच्या खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सीरम इनस्टिट्यूटला लागलेली आग, खासदारांची बैठक,राज्यासमोरील प्रश्न, मेट्रो कारशेड आदी मुद्यांवर भाष्य केले. सीरमला लागलेली आग बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगलं काम केले. ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करतात. सीरमच्या आगीवर आग पूर्ण विझल्यानंतर बोलूया, अस मुख्यमंत्री म्हणाले. अदर पुनावालांशी नंतर बोलणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक आणि इतर गोष्टींची माहिती त्यांच्याकडे कशी येते, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सीरमच्या आगीवर घातापाताचा संशय व्यक्त करणाऱ्यांना संयमाची लस टोचण्याची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
मराठा आरक्षण,कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रश्न मोदींसमोर मांडा
संसदेच्या अर्थसंकल्पापूर्वी राज्यातील खासदारांची बैठक घेतली. जलंसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या खासदारांसह बैठक झाली. खासदारांनी त्यांच्या समस्या मांडल्या. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदारांनी पंतप्रधानांना भेटलं पाहिजे. मराठा आरक्षणावर केंद्र सरकारला भूमिका घ्यावी लागणार आहे. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र राज्यात आणण्यासाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी, असं खासदारांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
खासदारांनी जे प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नांसंबंधी विभागवार समित्या बनवणार आहे. अधिवेशन झाल्यानंतर खासदारांची बैठक घेणार आहे. खासदारांच्या सूचनांनवर काय प्रगती झाली, याचा आढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
.<script data-ad-client="ca-pub-9584105174537500" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
राज्याच्या प्रश्नी पक्षभेद विसरून एकत्र या
जीएसटीच्या परताव्याबद्दल महाराष्ट्राच्या खासदारांनी पक्षभेद विसरुन एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे, असं आवाहन केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खासदारांसमोर मेट्रो कारशेडचं पुन्हा एकदा प्रेझेंटेशन करण्याची तयारी आहे. जनतेच्या प्रकल्पांवरून केंद्र आणि राज्यानं तू-तू-मै-मै करण्याची गरज नाही. केंद्र राज्यानं एकत्र येऊन जनतेच्या विकासासाठी काम करणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला.

