तर आपण पुढच्या वेळेला सरकार बनविल्याशिवाय राहणार नाही.
मुंबईः ”काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवेत”, असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय. मुंबईतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण कार्यक्रम पार पडला, त्यावेळी यशोमती ठाकूर बोलत होत्या.
या ठिकाणी जिथे आहात, तिथे तुम्ही राहिलंच पाहिजे. तर आपण पुढच्या वेळेला सरकार बनविल्याशिवाय राहणार नाही. एवढा माझा विश्वास आहे. थोरातांनी महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. थोरातांमुळे दोन महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली. कोणी तयार नसताना थोरातांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. तसेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्यात.
44 जागा बोलले असते तर 80 जागा आल्या असत्या: यशोमती ठाकूर
पुढील काळात काँग्रेसनं स्वबळावर लढावे आणि जास्त जागा जिंकल्या पाहिजेत. विधानसभा निवडणुकीत 12 ते 13 जागा काँग्रेसच्या निवडून येतील, असं बरंच जण बोलत होते. कोणी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी धुरा सांभाळून यश आणलं. आधी ते म्हणाले 16 जागा येतील आणि 44 जागा निवडून आल्या. 44 जागा बोलले असते तर 80 जागा आल्या असत्या, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्यात. बाळासाहेब थोरात आपण प्रदेशाध्यक्ष राहिलंच पाहिजे, पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलाय. पुढील काळात महिला संघटनांना ताकद देण्याची आवश्यकता आहे.

