नियमांचं उल्लंघन केलेल्या नागरिकांना पोलिसांकडून घरी नोटिसा पाठवण्यात येत आहे.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सरकारी नियमांचं उल्लंघन केलेल्या पुणेकरांना पोलिसांकडून घरी नोटिसा पाठवण्यात येत आहे. पुणे पोलीस विभागाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र या लॉकडाऊन काळात काही जणांनी सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात सरकारी नियमांच उल्लंघन केलेल्या नागरिकांना घरी नोटीसा पाठवण्यास सुरुवात झाली आहे. यात न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सरकारी नियमांचं उल्लंघन केलेल्या नागरिकांना घरी नोटीसा देण्यात येत आहे. कलम 188 नुसार सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नागरिकांवर कारवाई करण्यात आल्या होत्या. पोलीस विभागाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे लॉकडाऊनमधील 188 ची प्रकरणं निकाली निघणार आहेत. तब्बल 28 हजारांहून अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सध्या पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याकडून घरी जाऊन नोटीसा बजावण्याचं काम सुरु आहे. या सर्वांना देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये न्यायालयात हजर राहा, असे सांगण्यात आले आहे.

