घराच्या पत्र्यावर दगड टाकल्याच्या कारणावरुन शेजाऱ्यांनी उपसल्या एकमेकांवर तलवारी..
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- घराच्या पत्र्यावर दगड टाकल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात शेजा-यांनी एकमेकांवर कोयता आणि तलवारीने वार केल्याची घटना चिंचवडमधील विद्यानगरमध्ये घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून, तिघांना अटक केली आहे.
विक्रम भवरसिंग रजपूत (वय २२, रा. विद्यानगर, चिंचवड) याने मी दगड मारला नसल्याचे सांगितले. घरात आरडाओरडा करु नका मी बाहेर येतो असे म्हणाले. बाहेर काळे कुटुंबातील सदस्य कोयता आणि सत्तूर घेऊन उभे होते. रजपूत यांना पाहताच त्यांनी शिवीगाळ सुरु केली. शिवीगाळ होत असल्याचे पाहून रजपूत यांचा लहान भाऊ आकाश व त्याचा मित्र रोहित भोसले धावत आले. आरोपींनी आकाश याच्या डोक्यात, हातावर कोयत्याने वार करुन जखमी केले. रजपूत यांच्या हातावरही वार झाला.
काळे कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीनुसार रजपूत कुंटुांवातील सदस्यांनी तिफाना काळे यांच्या डोक्यात तलवार मारली. ते पाहून मुले किरण, करण आणि मेहुणा गब्बर पवार धावून आले. रजपूत कुटुंबातील सदस्यांनी पती, मुलगा आणि मेहुणा पवार याला तलवार आणि कोयत्याने गंभीर जखमी केल्याचे तकारीत म्हटले आहे.

