पश्चिम दिल्लीत 13 जानेवारीपासून दिल्ली पोलिसांनी हा नवीन नियम लागू केलाय.
नवी दिल्ली: आपण कार किंवा इतर कोणतंही वाहन चालवित असल्यास आपल्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मागील प्रवाशालाही सीट बेल्ट घालणे (Challan For Not Wearing Rear Seat Belt) बंधनकारक करण्यात आलेय. आपण हे न केल्यास 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यातच यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलीय. दिल्ली पोलिसांचा हा उपक्रम रस्ता सुरक्षा आणि जबाबदार ड्रायव्हिंग सुनिश्चित करण्यासाठी आहे.
पश्चिम दिल्लीत 13 जानेवारीपासून दिल्ली पोलिसांनी हा नवीन नियम लागू केलाय. 23 जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. सीट बेल्ट न घातल्याबद्दल पोलीस 1000 रुपयांपर्यंतची चलने फाडू शकतात. सध्या ही मोहीम फक्त पश्चिम दिल्लीतच राबविण्यात आलीय. हळूहळू दिल्ली पोलीस हा नियम दिल्लीच्या इतर भागातही राबविण्याच्या विचारात आहेत.
वाहतूक पोलीसही वाहनचालकांना दंड ठोठावणार
ज्यांच्या वाहनांना रिअरव्यू मिरर नसतील अशा मोटरसायकल-स्कूटर चालविणाऱ्यांसाठीही चलान वजा केले जाते. दिल्ली पोलीस हे नियम 1988च्या मोटार वाहन अधिनियम आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या अंतर्गत लागू करीत आहेत. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणे केवळ बेजबाबदार वर्तनच नाही, तर अत्यंत धोकादायकही आहे. वाहनचालक आणि समकक्ष किंवा समोरील सीट प्रवाशास सीट बेल्ट न घातल्याबद्दल मोटार वाहन कायद्यानुसार जबरदस्त दंड आकारण्यात येतो. जागरूकता नसणे आणि नियमांचे पालन न केल्याने कारच्या मागे असणारे लोक सीट बेल्ट घालत नाहीत. यामुळे अपघात झाल्यास प्रवाशांना गंभीर इजा होण्याची भीती असते.
दुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज
जर आपल्याला दुचाकी किंवा कारच्या चोरीची चिंता सतावतेय. तर आता आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण आज आम्ही आपल्याला अशा डिव्हाइसबद्दल सांगणार आहोत जे आपल्या कार आणि दुचाकीची पूर्णतः काळजी घेईल. या डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्याला वाहनाविषयी रिअल टाइम माहिती मिळेल आणि जेव्हा कोणी आपल्या गाडीला स्पर्श करेल तेव्हा आपल्याला मेसेज येईल.

